You are currently viewing खारेपाटणच्या केंद्र शाळेत भारतीय संविधान दिन साजरा..

खारेपाटणच्या केंद्र शाळेत भारतीय संविधान दिन साजरा..

कणकवली /-

कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्रथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं. १ या शाळेत भारतीय संविधान दिन शाळेचे मुख्यध्यापक प्रदीप श्रावणक यांच्या प्रमुख उपस्थित साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला शाळेचे पदवीधर शिक्षक संजय राऊळ, अर्चना तळगावकर, उपशिक्षक स्मिता कोरगावकर, अलका मोरे, रेखा लांघी, रुपाली पारकर व अंगणवाडी सेविका श्रीम. मोहिरे आदी उपस्थित होते.

प्रारंभी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे व उद्देशिकेचे समुदायिक वाचन शालेय विद्यार्थ्यांनी केले. तर “माझे संविधान माझा अभिमान” या विषयावर शाळेतील शिक्षकानी विद्यार्थ्यांना भारतीय संविधान बद्दल माहिती दिली. तसेच “माझे संविधान माझी जबाबदारी” या अनुषंगाने शाळेतील विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाबद्दल भाषणे केलीत. यावेळी शाळेतील विदयार्थी व विद्यर्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभिप्राय द्या..