You are currently viewing सिंधुदुर्गात एसटीचे अद्यापर्यंत बंदच..

सिंधुदुर्गात एसटीचे अद्यापर्यंत बंदच..

सिंधुदुर्ग /-

पगारात वाढ झाली तरी एसटी विलीनीकरण मुद्द्यावर ठाम असलेल्या सिंधुदुर्गातील संपकरी चालक वाहकांनी संपातून माघार घेतलेली नसल्यामुळे जिल्ह्यात एसटीचे चाक अजूनही ठप्पच झाले आहे. सिंधुदुर्गात संपात सहभागी झालेले प्रशासकीय, तांत्रिक वर्गातील बहुतांशी एसटी कर्मचारी पगारवाढीच्या मुद्द्यावर आणि वरिष्ठांच्या आर्जवानंतर कामावर परतले आहेत. मात्र एसटी सुरु होण्यासाठी महत्वाचा घटक असलेला चालक आणि वाहक वर्गातील कामगार अद्याप कामावर हजर झालेला नाही. राज्यात 11 हजार 549 कामगार कामावर हजर झाले आहेत. अन्य काही जिल्ह्यात चालक वाहक संपातून बाहेर येत कामावर हजार झाल्याने एसटीची चाके रस्त्यावर धावू लागली आहेत. सांगली जिल्ह्यातील सर्व 10 एसटी डेपो पूर्ण क्षमतेने सुरु झाले आहेत. मात्र सिंधुदुर्ग विभागात अद्याप चालक वाहक कामावर हजर झाले नसल्यामुळे एसटी ची चाके ठप्प झाली आहेत. दरम्यान विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ आणि सर्व वरिष्ठ अधिकारी एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे यासाठी अत्यंत संयमाने कामगारांची मने वळविण्याचा शिकस्तीने प्रयत्न करत आहेत.

अभिप्राय द्या..