You are currently viewing प्रामाणिक आणि सचोटी व्यापारामुळेच आचरा बाजारपेठेची भरभराट.;श्रीकांत सांबारी.

प्रामाणिक आणि सचोटी व्यापारामुळेच आचरा बाजारपेठेची भरभराट.;श्रीकांत सांबारी.

आचरा व्यापारी संघटनेचा वार्षिक सत्यनारायण पूजा आणि गुणगौरव सोहळा संपन्न..

आचरा /-

आचरा व्यापारी पेठेची भरभराट येथील व्यापाऱ्यांनी केलेल्या प्रामाणिक आणि सचोटीच्या व्यापारामुळे झाली आहे. याचाआदर्श युवा व्यापाऱ्यांनी घेऊन या बाजार पेठेची भरभराट करण्याचे आवाहन वैभवशाली पतसंस्थेचे चेअरमन आणि जेष्ठ व्यापारी श्रीकांत सांबारी यांनी केले.
आदर्श आचरा व्यापारी संघटनेचा स्नेहसमारंभ आणि वार्षिक सत्यनारायण महापूजा आयोजन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत व्यासपीठावर आचरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, जिल्हा परिषद सदस्य जेराँन फर्नांडिस, पंचायत समिती सदस्या निधी मुणगेकर,उपसरपंच पाडूरंग वायंगणकर, व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष मंदार सांबारी, माणिक राणे, जयप्रकाश परुळेकर, पंकज आचरेकर, हेमंत गोवेकर,निलेश सरजोशी, जेष्ठ व्यापारी विनायक परब,अनिल करंजे,राजन पांगे,श्रीमती लाड यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जेष्ठ व्यापारी विनायक परब,अनिल करंजे, शिवराम शेटये,रघुवीर ढेकणे, अरविंद घाडी,लालजी पटेल या जेष्ठ व्यापाऱ्यांचा तसेच वकीली परीक्षा पास झालेली अँडव्होकेट सायली आचरेकर, पदवी परीक्षा उत्तिर्ण मिनल कोदे यांसह दहावी बारावी पास व्यापारी पाल्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी बोलताना विनायक परब,अनिल करंजे यांनी व्यापारी संघटनेच्या कार्याचा गौरव केला. रात्री संपन्न झालेल्या बुवा समिर कदम,अरुण घाडी,पुजारे यांच्या तिरंगी भजनाच्या जंगी सामन्याने उपस्थितांना खिळवून ठेवले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आचरा व्यापारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विशेष परीश्रम घेतले होते.

अभिप्राय द्या..