You are currently viewing शिक्षक प्रशिक्षण शुल्क बाबतचा निर्णय शासनाने मागे घ्यावा; शिक्षक संघटनांची मागणी.

शिक्षक प्रशिक्षण शुल्क बाबतचा निर्णय शासनाने मागे घ्यावा; शिक्षक संघटनांची मागणी.

वैभववाडी /-

राज्याच्या शिक्षण विभागाने परिपत्रक काढून राज्यातील शिक्षकांचे सेवांतर्गत होणारे १२ वर्षानंतरचे वरिष्ठ वेतन श्रेणी व २४ वर्षांनंतरचे निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण साठी २००० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. यापूर्वी शासनाच्या कोणत्याही प्रशिक्षणास शुल्क आकारण्यात आलेले नव्हते. वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या वतीने घेण्यात येत असते. यापूर्वी अशा कोणत्याच प्रशिक्षणास शुल्क आकारण्यात आले नव्हते. शासनाने शुल्क आकारणी संदर्भात घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा असून तो अन्यायकारक आहे. शासनाने शुल्काबाबतचा हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा राज्यातील शिक्षकांच्या रोषाला शासनाला सामोरे जावे लागेल असा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे.

अभिप्राय द्या..