वेंगुर्ला /-

वेंगुर्ले तालुक्यातील आरवली येथील श्री देव वेतोबाचा वार्षिक जत्रोत्सव रविवार ५ डिसेंबर २०२१ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. यावेळी सकाळी धार्मिक कार्यक्रमानी सुरू होणाऱ्या या जत्रोत्सवात दुपारी महानैवेद्य, सायंकाळी सहा वा.पासून महाप्रसाद,रात्रौ पालखी प्रदक्षिणा, फटाक्यांची आतषबाजी व नाईक मोचेमाडकर नाट्य मंडळाचा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. 
तसेच सोमवारी ६ डिसेंबर रोजी श्री देवी सातेरीचा जत्रोत्सव, श्री देव वेतोबाकडे तुलाभार कार्यक्रम, गुणीजन गौरव कार्यक्रम व रात्रौ श्री देवी सातेरीकडे पालखी प्रदक्षिणा व नाईक मोचेमाडकर दशावतारी नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव वेतोबा देवस्थान कमिटी, गावकर, मानकरी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page