You are currently viewing सिंधुदुर्गातील कसई -दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ, नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर..

सिंधुदुर्गातील कसई -दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ, नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर..

२१ डिसेंबरला होणार मतदान तर २२ डिसेंबरला मतमोजणी- निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली घोषणा.;आजपासून आचारसंहिता लागू.

सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्गातील कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ, नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी २१ डिसेंबरला होणार मतदान तर २२ डिसेंबरला होणार मतमोजणी त्यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज केली,राज्यातील एप्रिल २०२० ते मे २०२१ या कालावधीत मुदत संपलेल्या ८१ आणि डिसेंबर २०२१ मध्ये मुदत संपणाऱ्या १८ तसेच नवनिर्मित सहा अशा एकूण १०५ नगरपंचायतींच्या प्रत्येकी १७ सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी १ ते ७ डिसेंबर २०२१ या कालावधीत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. ४ आणि ५ डिसेंबरला सुट्टी असल्याने ५.३० पर्यंत होणार आहे. तर २२ डिसेंबरला सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे

अभिप्राय द्या..