You are currently viewing खारेपाटण विभागातील एकूण – ५ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूका जाहीर..

खारेपाटण विभागातील एकूण – ५ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूका जाहीर..

कणकवली /-

जिल्हा परिषद मतदार संघ खारेपाटण या विभागातील एकूण ५ ग्रामपंचयतीच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम नुकताच प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आला असून २१ डिसेंबरला मतदान तर २२ डिसेंबर २०२१ ला मतमोजणी होणार आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्त्यांची एकच धावपळ उडाली आहे. ग्रामपंचयत पोटनिवडणूक – २०२१ जाहीर झालेल्या कार्यक्रमात खारेपाटण विभागातील चिंचवली, नडगीवे, शेर्पे, वायंगणी व कुरंगावणे या पाच ग्रामपंचायतीचा समावेश असुन चिंचवली, प्रभाग – २ ( अनु. जाती प्रवर्ग – एक ), नडगीवे प्रभाग – २ (अनु.जाती महिला प्रवर्ग – एक ), शेर्पे प्रभाग – २ ( इतर मागास प्रवर्ग – एक ), वायंगणी प्रभाग – ३ (इतर मागास प्रवर्ग – एक ), कुरंगावणे प्रभाग – १ (इतर मागास प्रवर्ग – एक ) आशा एकूण ५ जगासाठी पोटनिवडणूक होणार आहे. खारेपाटण विभागातील प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्याची सध्या उमेदवार शोधाशोध सुरू असून उमेदवाराच्या निवडी बिनविरोध होतील की निवडणूक लागेल तसेच इच्छुक उमेदवार किती असतील हे चित्र येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

कणकवली तालुक्यातील एकूण १९ ग्रामपंचायतीमध्ये रिक्त झालेल्या एकूण २३ जागांसाठी पोटनिवडणूक होणार असून खारेपाटण विभागातील महत्वाच्या ५ ग्रामपंचायतीचा यामध्ये समावेश आहे. पोटणीवडणुकीच्या जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार ३० नोव्हेंबर ते ०६ डिसेंबर २०२१ या कालावधीत उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल करावयाची आहेत. तर ७ डिसेंबर २०२१ ला उमेदवारी अर्जाची छाननी सकाळी – ११.०० वाजता होणार आहे. तसेच नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी ९ डिसेंबर २०२१ दुपारी – ३.०० वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे. त्यानंतर उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष मतदान दि.२१ डिसेंबर २०२१ ला सकाळी – ७.३० ते सायंकाळी – ५.३० वाजेपर्यंत होणार आहे. तर २२ डिसेंबर २०२१ ला कणकवली तहसील कार्यालय येथे मतमोजणी होणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दि.२७ डिसेंबर २०२१ ला पोटनिवडणुकीचा अधिकृत निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

अभिप्राय द्या..