You are currently viewing देवगड शिवसेना शहरप्रमुख तुषार पेडणेकर यांचे उपोषण स्थगित…

देवगड शिवसेना शहरप्रमुख तुषार पेडणेकर यांचे उपोषण स्थगित…

देवगड /-

देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी बाबत दिनांक 24 नोव्हेंबर रोजी उपोषण करण्याचे पत्र 9 नोव्हेंबरला जिल्हाधिकारी यांना दिले होते. 30 नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश प्राप्त झाले आहेत. या कारणास्तव आम्ही आमच्या 24 नोव्हेंबर रोजी करणारे उपोषण स्थगित करत आहोत. देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या भ्रष्टाचाराच्या चौकशी बाबतचे उपोषण आम्ही स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत लोकशाही मार्गाने 1 डिसेंबर रोजी करणार आहोत. अशा आशयाचे पत्र सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना देवगड शहर शिवसेना प्रमुख पिटी पेडणेकर यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..