You are currently viewing संविता आश्रमने ‘त्या’ निराधारास दिले नवे जीवन.;कुडाळचे माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी जपली सामाजिक बांधिलकी..

संविता आश्रमने ‘त्या’ निराधारास दिले नवे जीवन.;कुडाळचे माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी जपली सामाजिक बांधिलकी..

कुडाळ /-

कुडाळचे माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी पणदूर येथील संविता आश्रमचे संस्थापक संदीप परब यांना भैरव जोगेश्वरी मंदिरजवळ एक निराधार व्यक्ती रस्त्यावर असल्याची माहिती दिली.

५५ वर्षीय कुडाळकर हे गृहस्थ आजारपणांमुळे चालता येत नव्हते. कुडाळकर यांना रस्त्यावरच जीवन जगावे लागत होते. सोमवारी सायंकाळी ६ वाजता आश्रमाचे संस्थापक संदिप परब आणि सहकारी विजय नाईक यांच्याकडे आश्रमात कुडाळकर गृहस्थांना ओंकार तेली आणि मित्रमंडळ यांच्या सहकार्यने पाठविण्यात आले. तसेच ओंकार तेली यांच्यावतीने आश्रमाला रोख ५ हजार रु. मदत करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, भैरव जोगेश्वरी मित्रमंडळाचे भालचंद्र मेस्री, गजानन मेस्री, निलेश शिरसाट, महेश मेस्री, दिनेश मेस्री, सिध्देश राऊळ, प्रसाद कुमामेकर, साई मेस्त्री, समीर राऊळ, प्रसाद कोरगावकर, बाळा कुडाळकर, मंदार मेस्री, मायकल फर्नांडिस, सागर माळकर, नितीन मेस्री, मंदार मेस्त्री आदी उपस्थित होते. कुडाळकर यांची रस्त्यावरील जीवनपेक्षा चांगल्या सुरक्षित जीवनाकडे आता त्यांची वाटचाल सुरु झाली आहे.

अभिप्राय द्या..