कणकवली /-

बिबट्याची कातडी वाहनातून विक्री करिता तस्करी केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी दिनेश काशिनाथ गुरव, राहा. मु. पोस्ट पेंढरी, ता. देवगड याची जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग आर. बी. रोटे यांनी जमिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. आरोपीतर्फे अँड. राजेंद्र व्ही. रावराणे, अँड. प्राजक्ता म. शिंदे यांनी काम पाहिले.

दिनांक 16 सप्टेंबर, 2021 रोजी सावंतवाडी मळगाव घाटी भूतनाथ मंदिर नजीक असलेल्या रोडवर वन्य प्राणी बिबट्याची कातडी वाहन क्र. MH06 D8117 मधून विक्री करिता नेत असताना वनक्षेत्रपाल सावंतवाडी व त्यांच्या वनविभाग स्टाफने जप्त केली व गाडीतील समीर सूर्यकांत गुरव वै. 5 लोकांवर वन्यजीवन संरक्षण अधिनियम संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 2, 9, 39, 39(a) (b) (d), 39(2), 39(3) (a) (b) (c), 44, 49b व 51 अंतर्गत गुन्हा दाखल केला व त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी देण्यात आलेली होती. सदर प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेक्षक सिंधुदुर्ग यांचे मार्फत तपासकाम सुरु असून आरोपी दिनेश काशिनाथ गुरव. राहा. पेंढरी, ता- देवगड यांनी जामीन मिळणेकरिता जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सदर अर्जावर सुनावणी होऊन मा. न्यायाधीश 1 व सत्र न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला व आरोपीस रक्कम रु. 25,000/- च्या जमिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. प्रस्तुत कामातील आरोपी क्र. 2 नितीन सूर्यवंशी, आरोपी क्र. 4 किरण सावंत यांना यापूर्वीच उच्च न्यायालय मुंबई येथे जामीन मंजूर झालेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page