You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी पतसंस्था वेंगुर्ला यांच्या वतीने रमण वायंगणकर यांचा सत्कार.

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी पतसंस्था वेंगुर्ला यांच्या वतीने रमण वायंगणकर यांचा सत्कार.

वेंगुर्ला /-

वेंगुर्ले सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी रमण शंकरराव वायंगणकर यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. यानिमित्त त्यांचा सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी पतसंस्था वेंगुर्ला यांच्या वतीने वेंगुर्ले येथे सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा सरचिटणीस पदी विकास वैद्य यांची निवड झाल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी भंडारी पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक रमेश नार्वेकर, नंदन वेंगुर्लेकर, जयराम वायंगणकर, पतसंस्थेच्या व्यवस्थापक रेश्मा रेडकर,प्रा.आनंद बांदेकर, भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाचे सदस्य सत्यवान साटेलकर आदी उपस्थित होते. यावेळी रमण वायंगणकर हे भंडारी महासंघाच्या या पदावर विराजमान झाले हे वेंगुर्ले तालुक्यासाठी भूषणावह आहे. जिल्हा स्तरावर सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर असतात. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी पतसंस्थेला भरीव सहकार्य होईल, अशी अपेक्षा रमेश नार्वेकर यांनी बोलताना व्यक्त केली.यावेळी सत्काराला उत्तर देताना रमण वायंगणकर म्हणाले की भविष्यात सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी पतसंस्थेला जिल्हा भंडारी महासंघाच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आटोकाट प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.सत्यवान साटेलकर यांनी प्रास्तविक व आभार मानले.

अभिप्राय द्या..