You are currently viewing कणकवलीत इलेक्ट्रॉनिक दुकानाच्या वर्कशॉपला आग लागून सुमारे ७० हजाराचे नुकसान..

कणकवलीत इलेक्ट्रॉनिक दुकानाच्या वर्कशॉपला आग लागून सुमारे ७० हजाराचे नुकसान..

कणकवली /-

कणकवली शहरातील आचरा रोडवर असलेल्या एका इमारतीतील इलेक्ट्रॉनिक दुकानाच्या वर्कशॉपला आग लागली. या आगीत पुजारी इलेक्ट्रॉनिक्सचे मालक अशोक पुजारी यांच्या दुकानात दुरुस्तीसाठी आलेले फ्रिज, एसी जळून नुकसान झाले. ही घटना रविवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

कणकवलीत आचरा रोडवर पुजारी इलेक्ट्रॉनिक्स हे अशोक पुजारी यांचे दुकान असून त्या दुकानाच्या समोरील इमारतीच्या गाळ्यात पुजारी इलेक्ट्रॉनिक्समध्ये दुरुस्तीसाठी येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुरुस्तीचे वर्कशॉप आहे. दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास कामगार पुजारी इलेक्ट्रॉनिक दुकानात असतानाच शॉर्टसर्किटने दुकानात वायरिंग जळून आग लागली. यादरम्यान काही कामानिमित्त वर्कशॉपमध्ये कर्मचाऱ्यांनी जाऊन शटर उघडले असता वर्कशॉप मधून धूर येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर लगेच कणकवली नगरपंचायतच्या अग्निशमन बंबाला बोलावण्यात आले व तात्काळ धावपळ करत बाजूला असलेल्या पाण्याच्या टाकीतील पाण्याचा वापर करून आग आटोक्यात आणली. या वर्कशॉपमध्ये अनेक एसी, फ्रीज व दुरुस्तीसाठी आलेल्या अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ठेवलेल्या होत्या. तात्काळ आग आटोक्यात आणल्यामुळे पुढील मोठे नुकसान टळले. मात्र या आगीत अशोक पुजारी यांचे सुमारे ७० हजाराचे नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली.

अभिप्राय द्या..