You are currently viewing सिंधुदुर्गात भाजपा तहसीलदार कार्यालयासमोर २२ रोजी धरणे आंदोलन छेडणार .;राजन तेली यांची माहिती..

सिंधुदुर्गात भाजपा तहसीलदार कार्यालयासमोर २२ रोजी धरणे आंदोलन छेडणार .;राजन तेली यांची माहिती..

कणकवली /-

त्रिपुरा येथील न घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात मालेगाव, नांदेड, अमरावती येथे दंगली झाल्या आहेत. त्यात विनाकारण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सत्ताधारी पोलिसांमार्फत अडकवत आहेत. अटकेचा निषेध व्यक्त करण्यासाठी २२ नोव्हेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तहसील कार्यालसमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दारु, वाळू सह अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात पाठीशी घातले जात आहे. पालकमंत्र्यांच्या वरदहस्ताने हे अवैध धंदे सिंधुदुर्गाचा सुरु झाले आहेत. प्रशासनाचा धाक राहिलेला नाही असे राजन तेली म्हणाले. कणकवली येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली बोलत होते. त्रिपुरा घटनेच्यानंतर महाराष्ट्रात मालेगाव, नांदेड, अमरावती दंगली घडल्या आहेत. दुकाने जाळली गेली, कुठल्याही प्रकारची घटना घडली नसताना दंगली झाल्या आहेत. शासन साऱ्या गोष्टी बघत राहिले. दुकाने, गाड्या ऑफिस फोडण्यासाठी रस्त्यावर लोक आलेत. ४०-४० हजार लोक रस्त्यावर येतात, पोलीस गप्प का राहिले? आता पोलिसांनी फक्त अमरावतीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना वेठीस धरले. नागरिकांना वेठीस धरले आहे. भाजपला टार्गेट करण्याचे काम सत्ताधारी व पोलीस करत असल्याचा आरोप राजन तेली यांनी केला. महाविकास आघाडी सरकारच्या राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही. दंगली घडवणाऱ्या लोकांना सोडले जाते, पोलिसांचे गुप्तहेर खाते काय करत आहे? भाजपा कार्यकर्त्यांना होत असलेल्या या अटकेच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यात ४०० तहसीलदार कार्यालयात धरणे आंदोलन व मुख्यमंत्री यांना निवेदन दिले जाणार आहे. त्रिपुरा येथे न घडलेल्या घटनेची चौकशी निवृत्त न्यायाधीशामार्फत करावी. दंगल घडवणाऱ्या लोकांनावर कारवाई करा. रजा अकादमी बंदी घाला. सामान्य लोकांवर जे गुन्हे दाखल केले ते मागे घ्या पूर्व ग्रह दुषित धरून भाजपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली ती थांबवा, या “मागणीचे निवेदन दिले जाणार आहे, असल्याचे राजन तेली यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजरोस वाळू विकली जात आहेत, तीन वर्षे वाळू लिलाव झाले नाहीत. तरीही वाळू मिळत आहे. सत्ताधारी पालकमंत्री व आमदार दरवेळी मुंबईत बैठक लावतात. पण लिलावाच्या दराबाबत निर्णय झाला नाही. प्रशासनाच्या आशीर्वादाने वाळू बाजारात विकली जात आहे. जनतेला चढ्या दराने वाळू विकली जात आहेत. सर्वत्र दादागिरी केली जात आहे, नव्याने वाळू शिवसेनेची संघटना झाली आहे, त्यामागे कोण आहेत हे आता जनतेला दिसून येत असल्याचे राजन तेली यांनी सांगितले. दारु किंवा वाळू एक गाडी पकडली जाते. अवैध धंदे बंद होणार की नाही? प्रशासन नावाचे चीज जिल्ह्यात राहिले नाही. कोरोना कालावधीत सीमा सील असताना ३०० उपर जात होते. याबाबत सविस्तर माहिती जिल्हाधिकारी यांना देऊनही कारवाई झालेली नाही. मात्र, शेतकऱ्यांने बेलगाडीतुन वाळू आणल्यास कारवाई होते. त्यामुळे भाजपच्या पुढील जिल्हा कार्यकारिणीत जिल्हा प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याचे धोरण निश्चित केले जाईल, असा इशारा राजन तेली यांनी दिला आहे. एसटी आंदोलनात मंत्री अनिल परब यांच्याकडून दिलासा मिळेल असे वाटलं होतं. अनेक बसस्थानक विकसित केली जातील. पण विकास सोडाच, आंदोलन केले म्हणून जिल्ह्यातही कामगारांना निलंबित केलं आहे. त्या कामगारचि निलंबन मागे न घेतल्यास भाजपा आंदोलन छेडणार असल्याचे राजन तेली यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..