You are currently viewing शिवसेना सरपंच- उपसरपंच संघटनेच्या मागणीला यश.;विज देयकांचा प्रश्न महाराष्ट्र शासनाने कायमस्वरूपी काढला निकाली..

शिवसेना सरपंच- उपसरपंच संघटनेच्या मागणीला यश.;विज देयकांचा प्रश्न महाराष्ट्र शासनाने कायमस्वरूपी काढला निकाली..

सिंधुदुर्ग /-

ग्रामपंचायत हद्दीतील दिवाबत्तीची देयके भरणेसाठी महावितरण कडुन ग्रामपंचायत प्रशासनावर दबाव येत होता. सदर देयके भरणे हे ग्रामपंचायतीच्या दृष्टिने आर्थिक दृष्ट्या खुपच कठीण होत होते. दिवाळी सणाच्या अगोदर महावितरणने विदयुत देयके न भरल्यामुळे काही गावामध्ये दिवाबत्ती कनेक्शन बंद केले होते. हि बाब निदर्शनास येतातच शिवसेना सरपंच उपसरपंच संघटनेने महावितरण विरोधात आवाज उठवला होता. व तातडीने आपला निर्णय बदलवून तोडलेली विज जोडणी पुर्ववत करणेस भाग पाडले होते.

महावितरणचा हा कारवाईचा बडगा चुकिचा असल्याचे शिवसेना सरपंच उपसरपंच संघटनेने मा. पालकमंत्री श्री. उदयजी सामंत, मा. खासदार श्री. विनायकजी राऊत, मा. आमदार श्री. वैभवजी नाईक यांच्या निदर्शनास आणुन दिले. त्याच अनुषंगाने तातडीने मा. ग्रामविकास मंत्री श्री. हसनजी मुश्रीफ यांच्याशी मा. आमदार श्री. वैभवजी नाईक यांनी चर्चा केली. यावर तोडगा काढण्याचे आश्वासन मा. ग्रामविकास मंत्री यांनी दिले. तसेच शिवसेना सरपंच उपसरपंच संघटनेने या संदर्भात कोल्हापुर जिल्हयातील माणगांव ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच श्री. राजु मगदुम यांची भेट घेवुन या संदर्भात सविस्तर चर्चा केली. महावितरण च्या चुकिच्या निर्णया विरोधात सरपंच श्री. राजु मगदुम यांनी कायदेशीर मार्गाने अभ्यास पुर्ण लढा देऊन महावितरणचा निर्णय हा चुकिचा व मनमानीचा असल्याचे निदर्शनास आणुन दिले. त्याच अनुषंगाने शिवसेना सरपंच उपसरपंच संघटनेने पाठपुरावा केल्यामुळे दिनांक 15.11.2021 रोजी ग्रामपंचायतला डोकेदुखी ठरत – असलेला विज देयकांचा प्रश्न महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासन निर्णय निर्गमित करून कायमस्वरूपी निकाली काढणेत आला. यासाठी शिवसेना सरपंच उपसरपंच संघटना सिंधुदुर्ग यांच्या वतीने मा. मुख्यमंत्री श्री. उध्दवजी ठाकरे साहेब, मा. ग्रामविकास मंत्री श्री. हसनजी मुश्रीफ साहेब, मा. पालकमंत्री श्री. उदयजी सामंत साहेब, मा. खासदार श्री. विनायकजी राऊत साहेब, मा. आमदार श्री. वैभवजी नाईक साहेब यांचे जाहिर आभार मानत आहोत.

त्याचप्रमाणे घरबांधणीचे अधिकारा संबंधी असलेल्या जाचक अटी शिथील करून सुलभ सोप्या पध्दतीने घर बांधणीचे अधिकार ग्रामपंचायतला मिळतील याची ग्वाही मा. पालकमंत्री, मा. खासदार, मा. आमदार यांनी दिली आहे. याच प्रमाणे प्रधानमंत्री आवास योजना प्रपत्र ड यादीनुसार बहुसंख्य गोर-गरीबावर केंद्र शासनाच्या चुकिच्या निकषामुळे होणारा अन्याय दुर करणेसाठी येणा या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवुन सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हयातील गोर-गरीब ला यांना न्याय मिळवून देणार असल्याचे मा. खासदार श्री. विनायकजी राऊत यांनी सांगितले आहे.

अभिप्राय द्या..