You are currently viewing गोवा बनावटीच्या ४८ लाखांच्या अवैध दारुसह ६४लाखांचा मुद्देमाल जप्त..एक्साईज कणकवली पथकाची दमदार कामगिरी..

गोवा बनावटीच्या ४८ लाखांच्या अवैध दारुसह ६४लाखांचा मुद्देमाल जप्त..एक्साईज कणकवली पथकाची दमदार कामगिरी..

सिंधुदुर्ग /-

मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील ओसरगाव विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ टेम्पोतून लपवून नेत असलेले गोवा बनावटीची 48 लाखाची दारू उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी पहाटे जप्त केली. टेम्पोत ठेवलेल्या मैद्याच्या पिठाच्या पोत्याच्या आड दारूचे बॉक्स लपवून ठेवण्यात आले होते. याची गुप्त माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्या नुसार सापळा रचून 20 नोव्हेंबर रोजी सकाळी ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी रवि चंद्रकांत जाधव (वय २८ वर्षे रा . विनोबा भावे खारबाय रोड भिवंडी जि . ठाणे) नरेंद्र रामसेवक गुप्ता (वय ३२ वर्षे रा . खारबाव रोड अंजुर फाटा, भिवंडी जैन मंदिराच्या समोर जि ठाणे), सिध्दार्थ मधुकर घोडके (वय ३५ वर्ष रा. हनुमान नगर दहिसर चेकनाका केतकीपाडा दहिसर ईस्ट मुंबई) यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (ए), ( ई ) ८०, ८१, ८३, व ९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीना न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक कणकवली यांनी ही कारवाई केली. तसेच टाटा कंपनीचा चॉकलेटी रंगाचे मालवाहू टेम्पो क्रमांक एम . एच . ०४ जे . के . ७ ९ ०१ व क्रमांक एम . एच . ०४ जे . के . ९ ५७३ मध्ये विविध ब्रॅन्डच्या गोवा बनावटीच्या विदेशी दारू चे ७५० मिली मापाचे १३० बॉक्स (१५६० बाटल्या ), १८० मि.ली मापाचे २६५ बॉक्स (१२७२० बाटल्या ) व ५०० मि ली मापाचे १६० बॉक्स (३८४० टीन ) अशी ४८ लाख २३ हजार ८ ९ ४ व दारु जप्त करण्यात आली. तर वाहनांची किंमत १६ लाख मिळून एकूण रु ६४ लाख,२३हजार ,८ ९ ४ किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. अधीक्षक डॉ. बी . एच . तडवी यांच्या मार्गदर्शनानुसार निरीक्षक पी . जी . सावंत, यांनी ही कारवाई केली. सदर कारवाईमध्ये दळवी , पुजारी निरीक्षक , जी . सी . जाधव, दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, सहाययक दुययम निरीक्षक सुरज चौधरी, स्नेहल कुवेसकर, रणजीत शिंदे , शिवशंकर मुपडे , जंगम, यांनी सहभाग घेतला. मदतनीस म्हणून साजिद शहा व श्री खान यांनी काम केले . गुन्हयाचे पुढील तपासकाम पी . जी . सावंत निरीक्षक कणकवली करत आहेत.

अभिप्राय द्या..