You are currently viewing सावंतवाडी न.प.तर्फ़े विविध स्पर्धेचे आयोजन.;सभापती सुधीर आडिवरेकर यांचे नावनोंदणीचे करण्याचे आवाहन..

सावंतवाडी न.प.तर्फ़े विविध स्पर्धेचे आयोजन.;सभापती सुधीर आडिवरेकर यांचे नावनोंदणीचे करण्याचे आवाहन..

सावंतवाडी /-

सावंतवाडी नगरपरिषदेच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा-२ अभियान अंतर्गत खुल्या गटासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या इच्छुक नागरिकांनी नगर परिषद कार्यालयात आपली नावनोंदणी करावी, असे आवाहन नगर परिषद प्रशासन, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांच्याकडून करण्यात आले आहे. तर अवकाळी पावसामुळे उद्या २१ नोव्हेंबरला होणारी चित्रकला स्पर्धा सकाळी 8 ते 10 यावेळेत जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्याना ऐवजी श्री पंचम खेमराज महाविद्यालयात होणार असल्याची माहिती आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनी दिली.

अभिप्राय द्या..