कुडाळ /-

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची नूतन कार्यकारणीची सभा आज दिनांक ०७/११/२०२१ रोजी सिद्धीविनायक मंगल कार्यालय रेल्वेस्टेशन रोड, कुडाळ येथे महाराष्ट्र शासन कोविड- च्या सर्व नियमांचे पालन करून सभा घेण्यात आली.सभा अध्यक्ष निवडणूक अधिकारी म्हणून महासंघाचे माजी सरचिटणीस श्री.राजू गवंडे यांनी काम पाहिले.गवंडे यांनी प्रस्ताविक सुरवात करून मिटिंग सुरू करण्यात आली.या सर्वसाधारण सभेत जिल्हा भंडारी महासंघ,सिंधुदुर्गच्या नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष म्हणून वेंगुर्ला तालुक्यातील श्री.रमण शंकर वायंगणकर यांची जिल्हा कार्यकारणी च्या सर्वसाधारण सभेत सर्वांच्या एकमताने अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.तर जिल्हा सरचिटणीस पदी ..श्री. विकास वैद्य यांची निवड करण्यात आली.ही निवडणूक प्रक्रिया जिल्ह्याचे माजी सरचिटणीस सभा अध्यक्ष श्री.राजू गवंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.त्यांना मदतनीस म्हणून श्री.विकास वैद्य यांनी काम पाहिले.विकास वैद्य यांनी मागील सर्व जमा खर्च अहवालाचे कार्यकारणी समोर वाचन करून दाखवले.

अध्यक्ष निवड झाल्यानंतर कार्यकारणीतील ईतर पदाधिकारी यांच्या सर्वांच्या एकमताने सभागृहात निवडी करण्यात आल्या.सरचिटणीस पदी वेंगुर्ला तालुक्यातील विकास वैद्य यांची निवड करण्यात आली.त्यात महासंघ जिल्हा कार्याध्यक्षपदी देवगडचे हेमंत करंगुटकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.तर उपाध्यक्षपदी मालवणचे सुनिल नाईक ,दोडामार्ग चे संजय खडपकर निवड करण्यात आली.आणि भंडारी महासंघ जिल्हा सहसचिपदी व प्रसिद्धी प्रमुख पदी कुडाळचे समील जळवी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.आणि सहा सचिव पदी सावंतवाडी चे उल्हास हळदणकर यांची देखील निवड करण्यात आली आहे.खजिनदार म्हणून कणकवलीचे लक्ष्मीकांत मुंडये यांची निवड करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या पदाधिकारी यांची निवड झाल्या नंतर नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारणीसमोर माजी सरचिटणीस यांच्या कडून नविन सरचिटणीस यांनी महासंघाच्या संपूर्ण दप्तराचा कार्यभार स्वीकारला.यावेळी भंडारी महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी अध्यक्ष अतुल बंगे,रमण वायंगणकर ,समील जळवी,राजू गवंडे ,सुनिल नाईक,जयप्रकाश चमणकर ,श्रीकांत वेंगुर्लेकर,प्रकाश पावसकर ,गजानन वेंगुर्लेकर , विकास वैद्य,शरद पावसकर ,विलास आसोलकर ,संजय खडपकर ,मोहन गवंडे ,परितोष गवंडे अन्य भंडारी समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page