You are currently viewing शिवप्रेरणा युवा मित्र मंडळ व राजेश पडवळ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर संपन्न.;१५० नागरिकांनी केले रक्तदान..

शिवप्रेरणा युवा मित्र मंडळ व राजेश पडवळ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर संपन्न.;१५० नागरिकांनी केले रक्तदान..

वैभववाडी /-

शिवप्रेरणा युवा मित्र मंडळ मुंबई (कुर्ली) व राजेश पडवळ जनसेवा चारीटेबल ट्रस्ट वैभववाडी तसेच भ. क. ल. वालावलकर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवार दिनांक १८ नोव्हेंबर, २०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत श्री कुर्लीदेवी मंदीर पटांगणावर हे शिबिर संपन्न झाले. या शिबिरामध्ये हर्निया, अपेंडिक्स, अल्सर, मोतीबिंदू, मुळव्याध, मुतखडा, चरबीचे आजार, कार्डियाक, थायरॉईड, कान, नाक, घसा, महिलांच्या गर्भाशयाची शस्त्रक्रिया, नेत्र तपासणी, सर्व प्रकारच्या रक्त तपासणी या शिबिरामध्ये या सर्व आरोग्य विषयक बाबींबाबत मार्गदर्शन, तपासणी व समुपदेशन करण्यात आले. जवळपास १५० नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.

यावेळी तुकाराम रघुनाथ रासम सचिव ग्राम उत्कर्ष मंडळ हरकुळ खुर्द, राजेश पडवळ जनसेवा चारीटेबल ट्रस्ट वैभववाडीचे अध्यक्ष राजेश मोतीराम पडवळ व विश्वस्त मनोज सावंत, कुर्ली गावच्या सरपंच दर्शना पाटील, उपसरपंच अंबाजी हुंबे, दिलीप पाटील मंडळ अधिकारी (महसूल), भ. क. ल. वालावलकर रुग्णालयाचे डॉक्टर संदीप पाटील, डॉक्टर धुमाळे, संकेत जांभळे, लुपिन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रविन प्रवीण पेडणेकर, देवस्थान समितीचे बंडू पाटील, कृष्णा पाटील, प्रदीप पाटील, राजेश सावंत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अमित चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजक शिवप्रेरणा मित्र मंडळाचे अध्यक्ष विनायक पाटील, उपाध्यक्ष संदीप सदानंद भोगले, कार्याध्यक्ष गणेश तुलसीदास पाटील, खजिनदार गणेश दिलीप राणे, सचिव शैलेश अनंत राणे, प्रसिद्धीप्रमुख रविकांत शशिकांत इंदप, सल्लागार नरेंद्र नीळकंठ भोगले, सतीश कृष्णा पाटील, उमेश देवेंद्र परब तसेच कुर्ली गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभिप्राय द्या..