You are currently viewing चित्रकार रांगोळीकार समीर चांदरकर राज्यस्तरीय कला सन्मान पुरस्काराने सन्मानित..

चित्रकार रांगोळीकार समीर चांदरकर राज्यस्तरीय कला सन्मान पुरस्काराने सन्मानित..

चौके /-

मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूल कट्टाचे कला शिक्षक आणि राज्यस्तरीय ख्यातीचे चित्रकार रांगोळीकार, वाळुशिल्पकार, मुर्तीकार समीर चांदरकर यांच्या कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन आर्ट बिट्स फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या मार्फत दिला जाणारा २०२१ सालचा राज्यस्तरीय ‘कला सन्मान’ पुरस्कार समीर चांदरकर यांना प्रदान करण्यात आला. प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या पुरस्कार प्राप्तीनंतर सदर पुरस्कारामुळे भविष्यात कलाक्षेत्रात उत्तमोत्तम कार्य करण्याची प्रेरणा आपल्याला मिळेल, अशी प्रतिक्रिया समीर चांदरकर यांनी दिली आहे. आतापर्यंत अनेक रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेतील शेकडो पारितोषिके आणि विविध पुरस्कार मिळविलेल्या समीर चांदरकर यांना आर्ट बिट्स फाउंडेशनचा आणखी एक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

अभिप्राय द्या..