You are currently viewing संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न…

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न…

कणकवली /-

सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे संपूर्ण भारतभर रक्तदान शिबिर राबविले जातेे. त्याचाच एक भाग म्हणून गुरूवार दि. १८ नोव्हेंबर, २०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली ब्रँचमध्ये मातोश्री मंगल कार्यालय येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये २१ युनिट रक्त संकलन करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्या रुग्णालयातील रक्तकेंद्र वैद्यकीय अधिकारी डाॅ. श्रीनिवास बेळणेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

“खून नालियो मे नही नाडीयो मे बहे”। असा संदेश निरंकारी बाबा हरदेव सिंह यांनी निरंकारी भक्तांना दिला होता आणि १९८६ पासून हा उपक्रम सातत्यपूर्ण आजही निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून अविरत चालू आहे.

सदर कार्यक्रमाला रक्तकेंद्र जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग टीमचे सहकार्य लाभले. यावेळी कणकवली सेक्टर संयोजक विलास जाधव व कणकवली, ओरोस, कुडाळ येथील निरंकारी भक्त, नागरिक उपस्थित होते. सेवादल यु. नं. ७७२ चे संचालक महेश पांचाळ यांच्या मार्गदर्शनामध्ये शिबिर यशस्वीतेसाठी सेवादलच्या बंधु भगिणींनी निष्काम भावनेने सेवा करत मोलाचे योगदान दिले.

अभिप्राय द्या..