You are currently viewing शिवप्रेरणा युवा मित्र मंडळ व राजेश पडवळ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन..

शिवप्रेरणा युवा मित्र मंडळ व राजेश पडवळ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन..

वैभववाडी /-

शिवप्रेरणा युवा मित्र मंडळ मुंबई (कुर्ली) व राजेश पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट वैभववाडी तसेच बी. के. एल. वालावलकर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक १८ नोव्हेंबर, २०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत श्री कुर्लीदेवी मंदीर पटांगणावर हे शिबिर संपन्न होणार आहे. तरी या शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी गणेश राणे ८४१९९७९६१७, रविकांत इंदप ९५९४८७७४५४ यांच्याशी संपर्क साधून शिबिरासाठी नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये हर्निया, अपेंडिक्स अल्सर, मोतीबिंदू, मुळव्याध, मुतखडा, चरबीचे आजार, कार्डियाक, थायरॉईड, कान, नाक, घसा, महिलांच्या गर्भाशयाचे शस्त्रक्रिया, नेत्र तपासणी, सर्व प्रकारच्या रक्त तपासणी या शिबिरामध्ये होणार आहेत. या आरोग्य शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..