You are currently viewing कणकवलीचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभूचा आज वार्षिक जत्रोत्सव धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

कणकवलीचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभूचा आज वार्षिक जत्रोत्सव धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

कणकवली /-

कणकवलीचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभूचा वार्षिक जत्रोत्सव आज त्रिपुरारी पौर्णिमेदिवशी मोठ्या थाटात साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून सकाळी पाषाणावर अभिषेक तसेच काकड आरती कार्यक्रम पार पडले. तद्नंतर देवदर्शन रात्री पालखी प्रदक्षिणा, टिपर पाजळणे आणि रात्रौ दत्तमाऊली पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ वेंगुर्ले यांचे दशावतारी नाटक होणार आहे.

दरवर्षी या मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेदिवशी वार्षिक जत्रोत्सव साजरा होतो. या उत्सवाला कणकवलीसह जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून भाविकांची गर्दी होते. जत्रोत्सवानिमित्त मंदिराची सजावट करण्यात आली आहे. गतवर्षी कोरोनामुळे हा उत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला होता. यावर्षी कोरोनाचे संकट नियंत्रणात आल्याने दरवर्षीच्या उत्साहात हा उत्सव साजरा होणार आहे. कोरोनाचे नियम पाळून साजरा होणार्‍या या वार्षिक जत्रोत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..