You are currently viewing कणकवलीतील निलेश गोवेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस प्रांतिक सदस्यपदी निवड.;खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्तीपत्र.

कणकवलीतील निलेश गोवेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस प्रांतिक सदस्यपदी निवड.;खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्तीपत्र.

कणकवली /-

कणकवली शहरातील प्रतिष्ठित नागरिक तथा माजी शिवसेना जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांचे चिरंजीव निलेश गोवेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस च्या प्रांतिक सदस्यपदी निवड करण्यात आली असून खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते गोवेकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत निलेश गोवेकर यांनी 30 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर निलेश गोवेकर यांचा योग्य सन्मान पक्षात केला जाईल असे प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले होते. त्यानुसार निलेश गोवेकर यांच्यावर प्रांतिक सदस्यपदाची जबाबदारी पक्षश्रेष्ठींकडून सोपविण्यात आली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अभिप्रेत असणारी पक्षसंघटना बळकट करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असणार असल्याचे प्रांतिक सदस्यपदी निवडीनंतर निलेश गोवेकर म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, काका कुडाळकर, अबिद नाईक, व्हिक्टर डांटस, प्रफुल्ल सुद्रीक आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..