You are currently viewing शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कुडाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले अभिवादन !

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कुडाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले अभिवादन !

कुडाळ /-

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कुडाळ येथील शिवसेना शाखेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महाविकासआघाडीतील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार सुप्रिया सुळे या सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून हा दौरा सुरू करण्यापूर्वी त्यांनी कुडाळ येथे शिवसेना शाखेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोगटे, सरचिटणीस भास्कर परब, प्रभारी तालुकाध्यक्ष शिवाजी घोगळे, कणकवली नगरसेवक अबिद नाईक, नजीर शेख, सर्वेश पावसकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजन नाईक, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, बाळा पावसकर, सचिन काळप, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे, माजी नगरसेवक महेंद्र वेंगुर्लेकर तसेच काँग्रेसचे प्रभारी तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, जिल्हा बँक संचालक विद्या प्रसाद बांदेकर, तबरेज शेख, चिन्मय बांदेकर, आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..