You are currently viewing लोकसंवाद लाईव्ह थोडक्यात बातम्या.

लोकसंवाद लाईव्ह थोडक्यात बातम्या.

ब्युरो न्यूज /-

▪️ पहिलीपासूनच्या शाळा लवकरच सुरु होणार? सरकार अनुकूल, कृती दलाशी चर्चेनंतर याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता

▪️राज्यातील चार शहरांत ध्वनी प्रदूषण मर्यादेबाहेर; यामध्ये मुंबई, सोलापूर, नाशिक आणि अमरावतीचा समावेश

▪️राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरु, सतेज पाटील-अमल महाडिक आमने सामने

▪️पुणेकरांना आता रिक्षा प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार, येत्या 22 नोव्हेंबरपासून ही भाडेवाढ होणार

▪️ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना व्यंगचित्रातून श्रद्धांजली

▪️केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत भाजप पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार, अमित शहा 26 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता

▪️महाराष्ट्रात मंगळवारी ९४८ कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.तर ८८६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

▪️भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला लवकरच नवीन स्वस्त एअरलाईन्सची सुरुवात करणार, 72 विमानांची दिली ऑर्डर

▪️अमेरिकेला पछाडत चीन ठरला जगातील सर्वात श्रीमंत देश, मॅकिन्से अ‍ॅण्ड कंपनीच्या संशोधन विभागाची माहिती

▪️राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी आम्हां सर्वांकडून शुभेच्छा- देवेंद्र फडणवीस

▪️ विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी; राज्यात 6 जागांसाठी 10 डिसेंबरला मतदान तर 14 डिसेंबरला निकाल जाहीर होणार

▪️ रिअल इस्टेट समूह आयआरईओचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ललित गोयल यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक; ईडीची कारवाई

अभिप्राय द्या..