You are currently viewing बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या ४१ नर्सेसची नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी रूग्णालय मुंबई येथे निवड.

बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या ४१ नर्सेसची नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी रूग्णालय मुंबई येथे निवड.

कुडाळ /-

बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या जी. एन .एम .च्या १३ विद्यार्थिनी व बी.एससी. नर्सिंग च्या २८ मिळून ४१ विद्यार्थिनींची मुंबई विलेपार्ले येथील नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयांमध्ये नर्स म्हणून कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली. या निवड समितीमध्ये नानावटी रुग्णालयातर्फे सौ .शलाका सावंत-परब – डेप्युटी नर्सिंग सुपरिटेंडेंट, तसेच नानावटी रुग्णालयाच्या एच. आर.-कु. स्वीटी कांबळी, स्टाफ डेव्हलपमेंट हेड-सौ जसिंदा डिसोजा या निवड कमिटीच्या सदस्य होत्या. त्यानी विविध पद्धतीने सदर नर्सेस ची मुलाखत घेतल्यानंतर नर्सिंग विषयीच ज्ञान,पाहिल्यानंतर त्यांची एकमताने निवड केलेली आहे. एकाच महाविद्यालयाच्या एकाच वेळी ४१ विद्यार्थिनींची मुंबई विलेपार्ले येथील सुपरस्पेशालिस्ट नानावटी मॅक्स रुग्णालयात निवड होणे हे त्यांच्यातील उत्तम गुणात्मकता व उत्तम ज्ञान असलेल्याचे निर्देशक आहे. बॅरिस्टर नाथ पै यांच्या जयंती वर्षानिमित्त संस्थेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे नानावटी रुग्णालय व संस्थेतर्फे कॅम्पस इंटरव्ह्यू चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ. मीना जोशी, उप प्राचार्या कल्पना भंडारी, प्राध्यापक वैशाली ओटवणेकर ,प्रा.प्रणाली मयेकर, पल्लवी हरकुळकर, ज्योती साकीन ,प्रा.वैजयंती नर, प्रा.प्रथमेश हरमलकर, प्रा.प्रियांका माळकर, यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले . त्यानी पुढील वाटचालीसाठी विद्यार्थीनीना शुभेच्छा दिल्या.

या सर्व विद्यार्थीनी त्यांचे रुग्णालयातील सेवापूर्व प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करुन रुग्ण सेवेत रुजू झाल्या आहेत. विशेष म्हणजे पालक वर्गातून सुद्धा या निवडीबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.

अभिप्राय द्या..