You are currently viewing खासदार सुप्रियाताई सुळे १७ नोव्हेंबरला सिंधुदुर्ग दौऱ्यावर.;जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची माहिती.

खासदार सुप्रियाताई सुळे १७ नोव्हेंबरला सिंधुदुर्ग दौऱ्यावर.;जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची माहिती.

कुडाळ /-

संसद रत्न खासदार सौ.सुप्रियाताई पवार (सुळे)या दि.१७ नोव्हेंबर २०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देण्यासाठी आणि सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास समजून घेण्यासाठी जिल्हा दौ-यावर येत आहेत.त्याऺच्या या एक दिवसीय दौ-यात प्रामुख्याने मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर भेट हाच प्रमुख कार्यक्रम असेल.ती भेट झाल्यावर सायंकाळी ३-००वाजता त्या जिल्हाध्यक्ष मा.अमित सामंत यांच्या विनंती वरून जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक मार्गदर्शन करणार असुन सन २०२१ते २०२३च्या कालावधी साठी पक्ष सभासद नोंदणी शुभारंभ सुप्रियाताई पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.त्यानऺतर ४ वाजता नुकतेच व प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्याला पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेले श्री.परशुराम गंगावणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार मा.शरदश्चद्रजी पवार साहेब यांच्या वतीने गंगावणे यांच्या निवासस्थानी जाऊन खासदार सौ सुप्रियाताई पवार (सुळे) यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.तिथून त्या ओरोस सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकऱ्यांसाठी केलेल्या विमा योजनेच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती.तिथून इन्सुली सावंतवाडी येथे पुरग्रस्तासाठी फायबर बोट देण्याच्या जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नियोजित वचनपूर्तीच्या कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांच्या हस्ते फायबर बोट प्रदान करण्यात येणार आहे.तिथून त्या मुंबईला जाण्यासाठी प्रयाण करतील आशा प्रकारे दौ-याची माहिती जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली.

अभिप्राय द्या..