सावंतवाडी /-

महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या शेतकरी मासिक वाचन सप्ताहाचे आयोजन कलंबिस्त येथे शेतक-यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शेतकरी मासिक हे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत कृषी आयुक्तालय ,पुणे येथून दरमहा प्रसिद्ध केले जाते.कृषी व कृषीसलग्न विषयाशी निगडित माहितीपर लेख कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ, कृषी खात्यांचे अधिकारी ,कृषी क्षेत्रात काम करणा-या संस्था तसेच अनुभवी शेतकरी यांचेकडून प्राप्त करुन घेऊन प्रसिद्ध केले जातात. राज्यातील शेतक-याना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची तसेच कृषीविषयक झालेल्या संशोधनाची माहिती या मासिकाच्या माध्यमातून

वेळोवेळी पुरविली जाते.
शेतकरी मासिकात शेती विषयक विविध योजनांची माहिती तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, कृषी क्षेत्रातील प्रगतशील शेतकरी
यांच्या यशोगाथा या वरील लेखाचे वाचन व महत्व कृषीसहायक्क सी. एल् .राऊळ यानी दिली.शेतकरी मासिकात नाविन्यपूर्ण विषयावरील लेख शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त ठरत आहे. यातुन शेतकरी जागरूक राहतो. तसेच उच्चशिक्षित तरूण वर्गही शेतीकडे वळला असुन शेतीकडे उद्योगाच्या दृष्टीने वाटचाल करत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची योग्य सांगड घातल्यास शेती उद्योगात मोठी क्रांती घडू शकते
यावेळी सह्याद्री महिला शेतकरी गटाचे अध्यक्ष कविता देसाई, सविता पास्ते, शैलजा पास्ते, प्रणाली घोगळे,प्रमिला घोगळे, सत्वशिला न्हावी,प्रतिक्षा पास्ते, शितल नाईक,स्नेहा पास्ते इत्यादी शेतकरी उपस्थित होते.यावेळी शेतक-यानी शेतकरी मासिक वाचन सप्ताहा विषयी समाधान व्यक्त केले.तसेच सावरवाड आणि वेर्ले या गावातही शेतकरी मासिक वाचन सप्ताहाचे आयोजन करुन कृषीसहायक्क सी. एल् .राऊळ यानी शेतक-याना माहिती देऊन वार्षिक वर्गणीदार होण्याबाबत आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page