You are currently viewing महाराष्ट्रात दंगल घडविणाऱ्या व पोलिसांवर हल्ले करणाऱ्या देशविघातक शक्तींवर कठोर कारवाई करा!.;शिवप्रेमी सिंधुदुर्ग

महाराष्ट्रात दंगल घडविणाऱ्या व पोलिसांवर हल्ले करणाऱ्या देशविघातक शक्तींवर कठोर कारवाई करा!.;शिवप्रेमी सिंधुदुर्ग

कुडाळ /-

त्रिपुरा मध्ये झालेल्या हल्ल्याच्या नावाखाली महाराष्ट्रातील विविध शहरात मोर्चे काढले. मोच्र्यांच्याच्या नावाखाली एक प्रकारे दहशद निर्माण करण्याचा प्रयत्न समाज माध्यमातून येणाऱ्या व्हिडीओ मधून दिसत आहे. अनेक ठिकाणी दुकानांची वाहनांची तोडफोड करण्यात आली. दगडफेक करण्यात आली. विविध ठकाणी हिंसाचार करण्याचा प्रयत्न झाला. अशा हिंसाचारी धर्मांधांना त्वरित अटक करून शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेच्यावतीने कुडाळ तहसिलदार श्री. अमोल पाठक यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.

निवेदनात म्हणण्यात आले आहे की, पूर्वी अशाच पद्धतीने काश्मीर मध्ये दहशद निर्माण करून हिंदूंना पलायन करण्याची स्थिती निर्माण झालेली होती. हिंदू अल्पसंख्य असलेल्या देशातील प्रत्येक भागात हीच परिस्थिती बनत चाललेली आहे. महाराष्ट्रात सुद्धा तशीच परिस्थिती निर्माण करण्याची ही एक प्रकारे सुरुवात असून दहशद निर्माण करण्याचाच भाग आहे. मोर्चे निवेदने हा लोकशाहीत बाजू मांडण्याचा अधिकार आहे मात्र त्या नावाखाली कायदा मोडून हिंसाचार केल्या जातो गरीब दुबळ्या व्यवसायिकांवर आक्रमण दुकाने वाहने यांची तोडफोड या गोष्टी मुद्धाम हिंदू समाजाला भयभीत करण्यासाठी होत आहे. असे आम्हाला वाटते.

तहसिलदार यांच्याकडे मागणी करताना पत्रकात म्हटले आह की, पुर्वी देशाच्या ठराविक क्षेत्रांमध्ये असलेली ही प्रवृत्ती महाराष्ट्र राज्यात डोके वर काढू पाहात आहे. तरी यावर आत्ताच जरब बसणे आवश्यक आहे. छत्रपती शिवरायांच्या पवित्र महाराष्ट्र राज्यात रझा अकादमी सारख्या देशविघातक वृत्तींना थारा देता कामा नये. कोणताही सामाजिक, राजकीय दबावाला बळी न पडता दोषींना शिक्षा देण्यात यावी.

यावेळी सर्वश्री विवेक पंडीत, बंड्या सावंत, प्रसाद नातू, रमाकांत नाईक, राम सावंत, स्वरुप वाळके, रोहित पाटील, राम बांदेकर, साई मसगे, आबा नाईक, प्रकाश बरगडे, प्रसन्नजीत दळवी, राम राणे, राज वारंग, माधव भानुशाली, किरण कुडाळकर, किशोर सरनोबत, अनिश सावंत, अमित राणे, शिवा कोळी, आनंद सावंत, उदय आईर, प्रथमेश कुडाळकर, गणेश गोसावी, शुभम भोगटे, दैवेश रेडकर आदी देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभिप्राय द्या..