You are currently viewing कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसची मासिक बैठक संपन्न.;किल्ले स्पर्धा व सुदृढ बैल व बैलगाडी सजावट स्पर्धा बक्षीस वितरण झाले संपन्न..

कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसची मासिक बैठक संपन्न.;किल्ले स्पर्धा व सुदृढ बैल व बैलगाडी सजावट स्पर्धा बक्षीस वितरण झाले संपन्न..

कुडाळ /-

कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची मासिक बैठक आज रविवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सिद्धिविनायक हॉल कुडाळ येथे संपन्न झाली.कुडाळ शहर राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने दिवाळी निमित्त दिपोत्सव 2021 निमित्त किल्ले स्पर्धा व सुदृढ बैल व बैलगाडी सजावट स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न झाले.
आज 14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार आयोजित जनजागरण पंधरवडा चे उद्घाटन करण्यात आले.
कुडाळ तालुक्यात पक्षसंघटना वाडी साठी दर रविवारी तालुका काँग्रेसचे पदाधिकाऱ्यानी प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये प्रत्येक गावामध्ये कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्याचे ठरविण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सत्यानुसार निमित्त तेंडोली, माणगाव घावनाळे या जिल्हा परिषद मतदार संघातील गावांमध्ये पदयात्रा काढून लोकांमध्ये मध्ये केंद्र सरकारच्या जन विरोधी निर्णयांची जनजागृती करण्याचे ठरविण्यात आले.
त्यात सभासद नोंदणी कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भूत पर्यंत करण्याचे ठरविण्यात आले.
कुडाळ तालुक्यात नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर कुडाळ, तेंडोली ,माणगाव ठिकाणी करण्याचे ठरविण्यात आले.
श्री प्रकाश जैतापकर जिल्हा सरचिटणीस ,अभय शिरसाट प्रभारी तालुका अध्यक्ष, विजय प्रभू जिल्हा उपाध्यक्ष, प्रसाद बांदेकर सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक,संतोष मुंज माजी सरपंच धावनले,मंदार शिरसाट कुडाळ मालवण मतदार संघ युवक अध्यक्ष, सुंदर वल्ली स्वामी महिला तालुकाध्यक्ष, सुंदर सावंत शहर अध्यक्ष, चिराग मुंज एन एस यूआय अध्यक्ष,तबरेज शेख अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष, तोसिफ शेख शहराध्यक्ष, चिन्मय बंदेकर शहराध्यक्ष युवक, गोविंद कुंभार तालुका युवा उपाध्यक्ष, बाळू पारकर तेंडोली विभागीय अध्यक्ष, उल्हास शिरसाट, ताती राऊळ, पांडू खोचरे.

अभिप्राय द्या..