You are currently viewing साळगाव येथे ट्रक व कंटेनरमध्ये अपघात.;दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान..

साळगाव येथे ट्रक व कंटेनरमध्ये अपघात.;दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान..

कुडाळ /-
मुंबई-गोवा महामार्गावरील साळगाव येथे महामार्ग लगत उभ्या असलेल्या ट्रकला मागाहून येणाऱ्या कंटेनरने धडक दिली यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे याबाबत कुडाळ पोलिस ठाण्यात बेळगाव येथील ट्रक चालक चेतन भुजंग गाडेकर यांनी तक्रार दाखल केली आहे.

बेळगाव येथील ट्रक चालक चेतन भुजंग गाडेकर हे चौक येथे चिरे भरण्यासाठी आले होते ते चिरे भरून आपल्या ताब्यातील ट्रक नंबर ट्रक (केए २२ सी ०८४९) चौके ते कुडाळ मार्गे बेळगावच्या दिशेने जात असताना साळगाव येथे प्रातविधीसाठी आपला ट्रक रस्त्याच्या बाजूला लावून ते प्रातविधीसाठी गेले दरम्यान गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर नंबर (एमएच ४६ बीएम ३५०८) ते बीड येथील चालक श्रीधर विठोबा गरदे यांनी रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली यामध्ये कोणीही जखमी झाले नसले तरी दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले याबाबत बेळगाव येथील ट्रक चालक चेतन भुजंग गाडेकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्यानुसार कंटेनर चालक श्रीधर विठोबा गरदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा तपास पोलीस अमलदार सुरेश धोत्रे करीत आहेत.

अभिप्राय द्या..