You are currently viewing कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आंदोलनाला अभूतपूर्व यश. कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे दर व अपंगांना मिळणाऱ्या सवलती पूर्वीप्रमाणे सुरू.

कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आंदोलनाला अभूतपूर्व यश. कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे दर व अपंगांना मिळणाऱ्या सवलती पूर्वीप्रमाणे सुरू.

कुडाळ /-


कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने कोकण रेल्वे प्रशासनाला कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या रेल्वे मध्ये तिकीट दर कोरोना काळापूर्वी प्रमाणे आकारण्यात यावेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांना सवलत होती ती सवलत कायम राहावी. व अपंग व्यक्तींची सवलत पूर्ववत व्हावी. या प्रकारे या मागण्यांचे आंदोलन 27 ऑक्टोबर रोजी करण्यात आले ..आणि या आंदोलनाची दखल घेऊन रेल्वे प्रशासनातर्फे या मागण्या मान्य केल्यात. आणि रेल्वेचे दर प्रमाणात झालेले आहे. त्याचप्रमाणे सर्व गाड्या पूर्वीच्या क्रमांकाने धावलील. तसेच अपंग व्याकिना सवलत देण्याचे मान्य केले आहे .त्यामुळे काँग्रेसच्या आंदोलन यशस्वी झाल्याचे अभय शिरसाट यांनी सांगितले.
मेंगलोर गाडी ला कुडाळ मिळावा यासाठी पाठपुरावा करनार. व तात्पुरता प्रायोगिक तत्त्वावर थांबा मिळावा आंबा न मिळाल्यास तालुका काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. असे अभय शिरसाट यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..