You are currently viewing चौके बाजारपेठ मंडळाच्या वतीने ९ नोव्हेंबरला डबलबारी भजनाचा सामना…

चौके बाजारपेठ मंडळाच्या वतीने ९ नोव्हेंबरला डबलबारी भजनाचा सामना…

चौके /-

दिपावली निमित्त प्रतिवर्षीप्रमाणे आदर्श व्यापारी संघ चौके बाजारपेठ यांच्यावतीने चौके बाजारपेठ येथे मंगळवार दिनांक ०९ नोव्हेंबर रोजी श्री.सत्यनारायण महापूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.मंगळवारी सकाळी १०.०० वाजता श्री. सत्यनारायण पुजा,दुपारी १२.३० वा.श्रींची महाआरती,दुपारी १.०० वा.तिर्थप्रसाद,सायं ४.०० वा.पासून सुस्वर भजने, रात्रौ ठिक८.०० वा.
२०+२० डबलबारी भजनाचा जंगी सामना बुवा श्री.उदय पारकर,दत्तगुरु प्रासादिक भजन मंडळ,कासार्डे,गुरुवर्य श्री.प्रकाश पारकर बुवा,श्री.दिपक चव्हाण बुवा,पखवाज श्री घनःश्याम मेस्री विरुध्द बुवा श्री.सुशांत जोईल,श्री. महापुरुष प्रासादिक भजन मंडळ,कातवण,गुरुवर्य श्री.अभिषेक शिरसाट,श्री.प्रमोद हर्याण,श्री.तुषार परब,तबला तुषार शिंदे यांचात होणार आहे.

अभिप्राय द्या..