You are currently viewing मालवण समुद्रात आंघोळीचा आनंद लुटण्यास गेलेल्या महिला पर्यटकाला बुडताना स्थानिकांनी वाचविले..

मालवण समुद्रात आंघोळीचा आनंद लुटण्यास गेलेल्या महिला पर्यटकाला बुडताना स्थानिकांनी वाचविले..

मालवण /-

दिवाळीची सुट्टी पडल्याने सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मालवण येथे आलेल्या पर्यटकांच्या वीस जणांच्या ग्रुप मधील एक ५७ वर्षीय महिला चिवला बीच येथील समुद्रात समुद्र स्नानाचा आनंद लुटत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागल्याने समुद्रात बुडणाऱ्या पिंपरी पुणे येथील या महिलेला स्थानिकांनी वाचविल्याची घटना आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान घडली. मालवण येथे पर्यटनासाठी पुण्याहून २० जणांचा ग्रुप चिवला बीच येथे आला होता. यात आज सकाळी हे सर्वजण चिवला समुद्रात समुद्रस्नानासाठी उतरले होते. यात एक ५७ वर्षीय महिला पाण्याचा अंदाज न आल्याने बुडत असल्याचे स्थानिक पर्यटन व्यावसायिकांच्या निदर्शनास येताच फ्रान्सिस फर्नांडिस, सागर धुरी, स्वीटन सोज, कृष्णा सावंत यांनी घटनास्थळी धाव घेत त्या महिला पर्यटकाला सुखरूप किनाऱ्यावर आणले. तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

अभिप्राय द्या..