You are currently viewing कणकवली शहरातील छत्रपतींच्या पुतळा स्थलांतराच्या बैठकीच्या वेळेत बदल.;नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती.

कणकवली शहरातील छत्रपतींच्या पुतळा स्थलांतराच्या बैठकीच्या वेळेत बदल.;नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती.

कणकवली /-

गेली अनेक वर्षे स्थलांतरणाच्या मुद्द्यावरून निर्णयाच्या प्रतिक्षेत असलेल्या कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थलांतरणा बाबत निर्णायक बैठक 8 नोव्हेंबर रोजी सकाळी कणकवली नगरपंचायत येथे घेण्यात येणार होती. पण काही कारणास्तव या बैठकीच्या वेळेत बदल करण्यात आला असून, ही बैठक दुपारी 2.30 वा. नगरपंचायत च्या सभागृहात घेण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. या बैठकीचे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. गेली तीन वर्षे प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही महत्वपूर्ण बैठक घेण्यात येत असल्याचे श्री नलावडे यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..