You are currently viewing वैभववाडीत पडला अवकाळी पाऊस.;भात शेतीचे नुकसान..

वैभववाडीत पडला अवकाळी पाऊस.;भात शेतीचे नुकसान..

वैभववाडी /-

आज सायंकाळी ४‌ वाजण्याच्या सुमारास वैभववाडी तालुक्यातील अवकाळी पावसाने हजेरी लावली. सकाळपासून ढगाळ वातावरण तयार झाले होते. अवकाळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

सध्या सर्वत्र भात कापणीचे काम जोरात सुरू आहे. अवकाळी आलेल्या या पावसामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आज वैभववाडी तालुक्याचा आठवडा बाजार दिवाळी निमित्त गजबजून गेला होता. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारात ग्राहक व व्यापारी यांची देखील चांगलीच तारांबळ उडाली आहे.

अभिप्राय द्या..