You are currently viewing क्रांती घडवून प्रगतीकडे झेपावणारा चर्मकार समाज बघून अत्यानंद !खा. विनायक राऊत यांचे संत रविदास भवन भूमीपूजन सोहळ्यात प्रतिपादन..

क्रांती घडवून प्रगतीकडे झेपावणारा चर्मकार समाज बघून अत्यानंद !खा. विनायक राऊत यांचे संत रविदास भवन भूमीपूजन सोहळ्यात प्रतिपादन..

सिंधुदुर्ग /-

शैक्षणिक, सामाजिक दृष्टया सक्षम बनून सर्वांगीण क्रांती साधून प्रगतीकडे जलद गतीने झेपावणारा जिल्ह्यातील चर्मकार समाज बघून आपल्याला अत्यानंद होत आहे. संत रविदास भवन बांधण्याचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी जे कष्ट चर्मकार समाज घेत आहे,त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी हुमरमळा येथे केले. सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ संचलित संत रविदास भवनाचा भूमीपूजन सोहळा खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांचे हस्ते हुमरमळा येथे पार पडला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार विनायक राऊत यांनी समाज बांधवांना संबोधित केले. आमदार वैभव नाईक यांचे स्थानिक विकास निधीतून समाज भवनला निधी उपलब्ध झाला आहे.त्यातून पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होणार आहे.

यावेळी आमदार वैभव नाईक यांनी चर्मकार समाज भवन निर्मितीसाठी एकवटला आहे ही अभिमानाची बाब आहे. भविष्यात हे समाज भवन सर्व समाजालाही आदर्शवत ठरेल. पहिल्या टप्प्यासाठी आपला निधी या कामी खर्ची पडतोय याचा आनंद आपणास आहे, असे सांगितले. समाज मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास मालवण पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे,जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेते नागेंद्र परब,कुडाळ पंचायत समिती उपसभापती जयभारत पालव,हुमरमळा सरपंच जान्हवी पालव,भंडारी समाज जिल्हाध्यक्ष अतुल बंगे, कुडाळ गटविकास अधिकारी व प्रमुख मार्गदर्शक विजय चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष,प्रमुख मार्गदर्शक अनिल निरवडेकर,माजी जिल्हाध्यक्ष,जिल्हा बँक संचालक आत्माराम ओटवणेकर,माजी अध्यक्ष व सल्लागार प्रकाश चव्हाण,जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे,उपाध्यक्ष सुरेश पवार,सुधाकर माणगांवकर, लवू चव्हाण,कोषाध्यक्ष नामदेव जाधव,हुमरमळा तंटामुक्ती अध्यक्ष सच्चिदानंद पालव,भवन समितीचे पदाधिकारी श्रीराम चव्हाण,के.टी. चव्हाण,सुधीर जाधव,उदय शिरोडकर,राजन वालावलकर,वैभव पाताडे,प्रवक्ता सुनील जाधव,महानंद चव्हाण,प्रसिद्धिप्रमुख मंगेश आरेकर सर्व आजी माजी पदाधिकारी,सर्व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी खासदार राऊत यांनी समाज भवन साठी आणखी २५ लाख मंजूर करण्याचे आश्वासित केले.जिल्हाध्यक्ष सुजित जाधव समाज बांधवांनी एकजूट दाखवून भरीव निधी उभारल्यास हे कार्य लवकरच पूर्णत्वास नेऊ असे सांगितले.अजिंक्य पाताडे यांनी समाज भवन निर्मितीस सर्व पक्षीय सहकार्य मिळेल असे सांगितले. विजय चव्हाण यांनी समाजाने असेच एकसंध राहून कार्य केल्यास यश निश्चित मिळेल असे सांगितले.अनिल निरवडेकर यांनी समाजाने जमीन घेताना जे औदार्य दाखवले तेच दातृत्व आता भवन निर्मितीसाठी द्यावे असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भवन समिती प्रमुख श्रीराम चव्हाण यांनी,सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांनी तर आभार भवन समिती कार्यवाह उदय शिरोडकर यांनी केले.

अभिप्राय द्या..