कुडाळ /-

अवैधरित्या गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या नेरूर दुर्गवाड येथील अझीम मुजावर अखेर पोलिस ठाण्यात हजर झाला. दरम्यान या प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केलेल्या कंटेनर चालक इक्रम मोहम्मद गौस पाशा, क्लिनर शफि अजिज पाशा व अझीम मुजावर याला कुडाळ न्यायालयात हजर केले असता उद्या सोमवार १ नोव्हेंबरपर्यंत १ दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. कंटेनरमध्ये भरलेल्या गुरांपैकी एका बैलाचा मृत्यू गुदमरून झाला आहे त्याचे विच्छेदन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले.

अवैद्य गुरांची वाहतूक शनिवार ३० ऑक्टोंबर रोजी कुडाळ शहरातील नागरिकांनी पकडली संत राऊळ महाराज महाविद्यालय एस एन देसाई चौकात गुरे घेऊन जाणारा कंटेनर पकडल्यानंतर या कंटेनर मधील चालक व क्लिनर याला नागरिकांनी चांगले चोपले त्यानंतर हा कंटेनर कुडाळ पोलीस ठाणे येथे आणण्यात आला या कंटेनरमध्ये गुरे असल्याचे निष्पन्न झाले अवैद्य रित्या गुरांची वाहतूक करणाऱ्या व्यक्तींना तात्काळ पकडा अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली.होती

यावेळी भाजपचे अतुल काळसेकर, राजू राऊळ, बंड्या सावंत, शिवप्रेमीचे रमाकांत नाईक, देवेश रेडकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, प्रसाद नातू, मिलिंद देसाई आदी उपस्थित होते याबाबत भाजपचे अविनाश पराडकर यांनी सांगितले की गेले काही दिवस अवैद्य गुरे वाहतूक करणाऱ्यांच्या मागावर आम्ही होतो पण ते भेटत नव्हते आज शनिवारी हा कंटेनर महामार्गाच्या दिशेने जाताना दिसला या कंटेनरला संत राऊळ महाराज कॉलेज महाविद्यालय येथील एस. एन. देसाई चौकात पकडण्यात आला आणि त्यानंतर पुढील कारवाई पोलिसांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page