You are currently viewing फोंडा नवीन कुर्ली येथील ग्रामस्थांच्या प्रलंबित समस्या सोडवा नवीन कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष अनंत पिळणकर यांची जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी..

फोंडा नवीन कुर्ली येथील ग्रामस्थांच्या प्रलंबित समस्या सोडवा नवीन कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष अनंत पिळणकर यांची जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी..

जलसंपदा मंत्र्यांकडून तातडीने दखल घेत अधीक्षक अभियंत्यांना आदेश..

कणकवली /-

कणकवली तालुक्यातील नवीन कुर्ली ग्रामस्थाना नागरी सुविधा देण्यासंदर्भात नवीन कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे लक्ष वेधले. तसेच नवीन कुर्ली येथे नवीन ग्रामपंचायत स्थापने बाबतही श्री. पिळणकर यांनी जयंत पाटील यांच्याकडे मागणी केली. या मागणीच्या अनुषंगाने श्री पाटील यांनी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री थोरात यांना तात्काळ सूचना देत कार्यवाहीचे आदेश दिले. नवीन कुर्ली येथे राहणाऱ्या ग्रामस्थांना नागरी सुविधा देण्याबाबतही श्री पिळणकर यांनी जयंत पाटील यांच्याकडे मागणी करत लक्ष वेधले. गेले कित्येक वर्षे नवीन कुर्ली मधील ग्रामस्थ न्यायाच्या प्रतीक्षेत असून, याबाबत सातत्याने शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. जलसंपदा विभागामार्फत या ग्रामस्थांच्या मागण्यांना न्याय द्यावा अशी मागणीही श्री. पिळणकर यांनी याप्रसंगी केली. या मागण्यांसंदर्भात जयंत पाटील यांनी पिळणकर यांनी केलेल्या मागणीची तातडीने दखल घेत अधीक्षक अभियंता श्री थोरात यांना यासंदर्भात कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. अशी माहिती श्री पिळणकर यांनी दिली.

अभिप्राय द्या..