You are currently viewing जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांची आ. वैभव नाईक यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी केली चर्चा..

जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांची आ. वैभव नाईक यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी केली चर्चा..

कुडाळ /-

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांनी खासदार विनायक राऊत, माजी राज्यमंत्री ,आमदार दीपक केसरकर, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक तसेच अधिकाऱ्यांसमवेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांची आढावा बैठक घेतली. कुडाळ येथील लेमनग्रास हॉटेल येथे आज दुपारी हि बैठक पार पडली. ना.जयंत पाटील जिल्ह्यात आल्यानंतर कणकवली येथे राष्ट्रवादीचे नगरसेवक अबीद नाईक यांच्या निवासस्थानी आमदार वैभव नाईक यांनी ना. जयंत पाटील यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचे जिल्ह्यात स्वागत केले. यावेळी आमदार शेखर निकम, शिवसेना नेते संदेश पारकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादी नगरसेवक अबिद नाईक, काका कुडाळकर, सुभाष उर्फ बाबू सावंत, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. थोरात, सावंतवाडी वनविभाग उपवनसंरक्षक शहाजी नारनवर राजन नाईक आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..