You are currently viewing हुमरमळा गाळवणीवाडी येथील सार्वजनिक विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात वनविभागाला यश..

हुमरमळा गाळवणीवाडी येथील सार्वजनिक विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात वनविभागाला यश..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यातील हुमरमळा गाळवणीवाडी येथील सार्वजनिक विहिरीमध्ये असलेल्या नळपाणी योजनेच्या पाइपला पकडून राहिलेल्या बिबट्या वाघाला तेथील ग्रामस्थांसह वनविभागाने सुरक्षितरित्या बाहेर काढला. हा बिबट्या भक्ष्याचा पाठलाग करीत असताना विहिरीत पडला असावा असा अंदाज वन विभागाच्यावतीने व्यक्त केला जात आहे. दरम्यान या बिबट्या वाघाला वनविभागाने नैसर्गिक अधिवासात सोडले.

कुडाळ तालुक्यातील हुमरमळा गाळवणीवाडी येथील विहिरीमध्ये बिबट्या वाघ दिसून आला सार्वजनिक असून या विहिरीतून या वाडीतील घरांपर्यंत पाणी दिले जाते या विहिरीवर नळपाणी योजना कार्यान्वित आहे आणि सकाळी हे पाणी सुरू करण्यासाठी मनोहर कानडे हे पंप सुरू करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना विहिरीमध्ये पडलेला वाघ दिसून आला पाणी योजनेच्या पाईपलाईनला पकडून पाण्यामध्ये हा वाघ होता त्यांनी तात्काळ ग्रामस्थांसह वनविभागाला संपर्क साधला वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे तसेच अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व ग्रामस्थांच्या सहकार्याने या वाघाला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले हा वाघ विहिरीच्या मधोमध असलेल्या पाईप लाईनला पकडून असल्यामुळे त्याला बाहेर काढण्यासाठी लाकडी फळ्या पाण्यात टाकून पाण्यात पिंजरा सोडण्यात आला या पिंजरामध्ये वाघ बंद झाल्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आले हा बिबट्या भक्ष्याच्या शोधात विहिरीत पडला असावा असा अंदाज वनविभागाच्यावतीने व्यक्त केला जात आहे दरम्यान,दरम्यान बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले असल्याची माहिती वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..