बांदा /-
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री मा. जयंत पाटील यांच्या हस्ते बांदा येथील साई सेवा मंडळ यांच्या कडे नौका प्रदान करण्यात आली,चालु वर्षी पावसाळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष बांदा येथे पूरपरिस्थितीची पहाणी करण्यासाठी आले असता पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी बांदा,इन्सुली वासीयांना लाईफ जॅकेट,सायरन,नौका देण्याचे आश्वासन दिले होते. ये आश्वासन पुर्ण करत महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते बांदा वासियांना नौका सुपूर्त करुन आश्वासनाची पूर्तता करण्यात आली.
यावेळी मा. जयंत पाटील यांनी बोलताना म्हणाले पेट्रोल डिझेल चे वाढलेले भाव हे केद्रसरकार ची देणगी आहे. गँस, पेट्रोल, डीझेल चे भाव गगनाला भिडले आहेत. शेतकरी मोठ्या प्रमाणात डीझेल चा वापर करतात परंतु डीझेलचेही भाव पेट्रोल च्या बरोबरीतच आले आहेत. अशा वेळी शेतक-याला तारेवरची कसरत करावी लागत आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा तरी विचार करावा.
यावेळी व्यासपीठावर आमदार दिपक केसरकर,माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, महीला आयोग अध्यक्ष सौ. रुपाली चाकणकर,पक्ष निरीक्षक सौ.अर्चना घारेपरब, महिला जिल्हाध्यक्षा सौ. रेवती राणे, काका कुडाळकर होते.तसेच कार्यक्रम च्या वेळी सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, उपाध्यक्ष बावतीस फर्नाडीस,उद्योग व्यापार महिला जिल्हाध्यक्षा दर्शना बाबर देसाई, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष इफतेकार राजगुरू, शैलेश लाड, अस्लम खतिब, सलिम खतिब,आसिफ,अन्वर खान, संजय भाईप, माजी जि. प.सदस्या सौ.अर्चना पांगम, सुशांत पागम, ग्रा.पं.सदस्य साई काणेकर,भैया गोवेकर,अशोक परब, शाम धुरी,साई भक्त मंडळाचे राकेश केसरकर,प्रितम हरमलकर, साईराज साळगावकर,दर्शना केसरकर तसेच आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच बांदा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.