तर खुन्याना जेरबंद करण्याच्याही केल्या पोलिसांना सूचना..
सावंतवाडी /-
शहरात आज घडलेली घटना ही दुःखंद आणि चिंताजनक आहे. या घडलेल्या प्रकाराबाबत आपण पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांच्याशी चर्चा केली असून, पोलिस यंत्रणा कामाला लागली असून, खून्याचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
केसरकर पुढे म्हणाले की, त्या भागात सी.सी.टिव्ही कॅमेरा नसल्याने पोलिस तपासात थोडा व्यत्यय येत आहे. परंतु, अशा प्रकारच्या घटना घडू नयेत. यासाठी शहरात आणखी सी.सी.टिव्ही कॅमेरा लावण्यासाठी आपण प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तसेच शासनाने वृध्द महिलांबाबत घालून दिलेल्या नियमांचे पालन पोलिसांकडून होते की नाही याबाबत देखील आपण पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.