You are currently viewing राष्ट्रीय एकता दिनानिमित्त वेंगुर्ला येथे ३१ ऑक्टोबर ला चित्रकला व स्लोगन लेखन स्पर्धा..

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त वेंगुर्ला येथे ३१ ऑक्टोबर ला चित्रकला व स्लोगन लेखन स्पर्धा..

वेंगुर्ला /-


३१ ऑक्टोबर हा भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म दिवस संपूर्ण भारतभर ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रनिर्माण या हेतूने तरुणांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढावी यासाठी नेहरू युवा केंद्र कटिबद्ध असून या एकता दिनाच्या औचित्याने संपूर्ण भारतभर विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असून नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग,तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल लौकिक, वेंगुर्ला च्या सभागृहामध्ये ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता ‘राष्ट्रीय एकता दिनाचे’ आयोजन केले असून राष्ट्रीय एकतेविषयी शपथ युवकांना दिली जाणार असून ‘राष्ट्रीय एकता आपली ताकद’ या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली असून प्रथम,द्वितीय, तृतीय क्रमांक यांच्यासाठी रोख रुपये ५५५,४४४,३३३ व प्रत्येकी मेडल व प्रमाणपत्र तर उत्तेजनार्थ प्रथम व व्दितीय साठी मेडल व प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप असून स्पर्धकांनी जलरंगाचा वापर करणे अनिवार्य आहे.’राष्ट्रीय एकता’ या विषयावर ‘स्लोगन लेखन स्पर्धा’ सुद्धा होणार असून स्लोगन लेखन स्पर्धेत प्रथम, द्वितीय,तृतीय क्रमांकासाठी मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.तरी इच्छुक स्पर्धकांनी नाव नोंदणी साठी प्रा.सचिन परुळकर (९४२१२३८०५३) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर आणि सिंधुदुर्ग जिल्हा नेहरू युवा केंद्र समन्वयक मोहितकुमार सैनी यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..