You are currently viewing गृहराज्य मंत्री बंटी पाटील यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे साखर कारखान्याचं स्वप्न होणार पूर्ण.;सतिश सावंत यांची माहिती.

गृहराज्य मंत्री बंटी पाटील यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे साखर कारखान्याचं स्वप्न होणार पूर्ण.;सतिश सावंत यांची माहिती.

कणकवली /-

जिल्ह्यातील वैभववाडी कणकवली तालुक्यात ऊस शेती झपाट्याने वाढत आहे. डी वाय पाटील हे नांव सहकार,राजकारण, एज्यूकेशन या सर्व शेत्रात उज्वल आहे.आपल्याकडे कार्यशेत्र वाढविण्यासाठी मर्यांदा आहेत पन कणकवली,वैभववाडी तालुक्यात शेत्र वाढविण्यास मर्यादा नाहीत.पाच लाखाचं तुम्ही दिलेले उदिष्टच नव्हे तर आम्ही ८लाखाचं उद्दीष्ट स्वीकारण्याची आमची तयारी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला लहान भाउ समजून साखर कारखान्याने कोकणातील ऊस कार्यक्षेत्रात वाढ करून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचाही समावेश करावा व ऊस वाढीसाठी प्रयत्न करावेत.तसेच आमच्या जिल्ह्यतील राजकारण बघता यापुढील काळात साखरकारखाना निर्माण होणं कठीण आहे.यासाठी डि वाय पाटील संस्थेचा करखाना सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्हावा यासाठी प्रयत्न व्हावा. जिल्हा बँक कारखान्याला यापुढेही पतपुरवठा करण्यास सदैव तयार आहे. असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी व्यक्त केले. गगनबावडा असळज येथील डॉ. पदमश्री डॉ. डी. वाय पाटील सहकारी साखर कारखान्याचा सन २०२१-२२ चा १९ वा गळीत हंगाम शुभारंभ पार पडला. यावेळी कारखान्याचे चेअरमन आ. सतेज उर्फ बंटी पाटील, छत्रपती खा शाहू महाराज,खा.संजय मंडलिक,गोकुळ चेअरमन विश्वास पाटील,राष्ट्रवादी जिल्हाध्यश अे वाय पाटील,करविरचे आम. पी एन पाटील जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, संचालक गुलाबराव चव्हाण, कोल्हापूर ,जि.प अध्यश बजरंग पाटील, मानसिंग पाटील, जिल्हा बँक सीईओ अनिरुद्ध देसाई, कारखान्याचे अधिकारी जयदीप पाटील व संचालक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले, अडचणीच्या काळात या कारखान्याला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने मदत केली आहे. जिल्हा बँकेचे अध्यश सतिश यांचे कारखाना प्रगतीत मोठे योगदान आहे. या बँकेला आम्ही आयुष्यभर विसरणार नाही.सतेज पाटील- जिल्हा बँकेची मदत कशी घेता येईल यासाठी आमचा प्रयत्न सुरू असतो जिल्ह्याच उसाचं उत्पादन कस वाढवाव हे एक चँलेंज आहे. उसउत्पादन वाढविण्या साठी शेतक-यांनी कार्य शेत्र वाढवलं पाहीजे.जिल्हा बँकेचं सहकार्य कायम आहे.वीज उत्पादनातूही उत्पन्न चांगलं मिळतं आहे. अडचणीच्याकाळात जिल्हा बँकेने कायम मदत केली ती आम्ही विसरू शकत नाही.यावेळी बँकेने कर्जाचा व्याज दर११टक्या वरून तो १०.५० टक्के एवढा व्याज दर कमी केल्याने बँकेचे आभार मानतो. छत्रपती खा.शाहू महाराज ,गोकुळ चेअरमन विश्वास पाटील,राष्ट्रवादी जिल्हाध्यश अे वाय पाटील, खा.संजय मंडलिक यांनी मनोगत व्यक्त केले. आभार कार्यकारी संचालक जयदीप पाटील यांनी मानले.

अभिप्राय द्या..