You are currently viewing भाजपा किसान मोर्चा च्या जिल्हा सरचिटणीस पदी प्रफुल्ल उर्फ बाळु प्रभु यांची निवड

भाजपा किसान मोर्चा च्या जिल्हा सरचिटणीस पदी प्रफुल्ल उर्फ बाळु प्रभु यांची निवड

वेंगुर्ला
भाजपा किसान मोर्चा च्या जिल्हा सरचिटणीस पदी प्रफुल्ल उर्फ बाळु प्रभु यांची निवड करण्यात आली.भाजपा किसान मोर्चा च्या जिल्हा कार्यकारणी बैठकीत वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड गावचे प्रफुल्ल उर्फ बाळु प्रभु यांना भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.कुडाळ एमआयडीसी विश्रामगृहामध्ये आयोजित भाजपा किसान मोर्चाची पदाधिकारी निवडीची बैठक किसान मोर्चा चे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांनी आयोजित केली होती.या बैठकीस भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली,महिला मोर्चा च्या जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे , संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत,जिल्हा सरचिटणीस व किसान मोर्चा संयोजक प्रसन्ना ऊर्फ बाळु देसाई, ज्येष्ठ नेते विलास हडकर , जि.का.का.सदस्य बाळा सावंत ,ज्ञानेश्वर केळजी,जि.चिटनीस बंड्या सावंत आदी उपस्थित होते.यावेळी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांनी जिल्हा सरचिटणीस,जिल्हा उपाध्यक्ष,जिल्हा चिटनीस, महिला संयोजक तसेच १४ मंडलाच्या अध्यक्षांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.यावेळी मान्यवरांची सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देताना किसान मोर्चाच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांना शासनांच्या योजनांचा फायदा मिळवुन देण्याचे आवाहन करण्यात आले.

अभिप्राय द्या..