You are currently viewing तळगाव येथे महिला किसान दिन संपन्न

तळगाव येथे महिला किसान दिन संपन्न

मसुरे

  ग्रामपंचायत सभागृह, तळगाव येथे महाराष्ट्र शासन कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत तालुकास्तरीय महिला किसान दिनाचे आयोजन करण्यात आहे. यावेळी कृषि विज्ञान केंद्र किर्लोसचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख भास्कर काजरेकर यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व तर; सुकळवाड येथील गोकूळधाम गोशाळेच्या संचालिका तन्वी परब यांनी देशी गाईचे महत्त्व या विषयावर महिला शेतक-यांना मार्गदर्शन केले. यावेळी तळगाव सरपंच अनघा वेंगर्लेकर, उपसरपंच अनंत चव्हाण, आत्मा शेतकरी सल्ला समिती सदस्या उज्ज्वला दळवी, ग्रामपंचायत सदस्या निशीगंधा कदम आदी मान्यवर उपस्थित होते. तर कृषि विभागाचे तालुका कृषि अधिकारी विश्वनाथ गोसावी, कृषि सहाय्यक अमृता भोगले, मंदार सरमळकर, विदया कुबल, मनिषा गिते, पवन सौंगडे, ग्रामसेवक श्रीम. शेलटकर उपस्थित होते.
      यावेळी अरुणा सावंत, सुचिता पुजारे, आरती कांबळी, क्षमिका कुडाळकर आदी कृषि व कृषि संलग्न क्षेत्रात कार्यरत असणा-या महिलांनी आपले मनोगत उपस्थितांसमोर मांडले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वनाथ गोसावी यांनी केले तर सूत्रसंचालन अमृता भोगले व आभार मंदार सरमळकर यांनी मानले.   

अभिप्राय द्या..