वेंगुर्ला /-

वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाचा आज मंगळवारी नागरिकांच्या तत्परतेमुळे जीव वाचला. दहा दिवसातील ही दुसरी घटना असून वेळीच त्याला पाण्याबाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.

शिरोडा समुद्रकिनारी सद्या मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी असते. मात्र काही अति हौशी पर्यटक पोहण्याच्या नादात समुद्राच्या पाण्यात उतरतात मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागतात.

आजगाव येथील मुंबई येथून गावात नातेवाईकांकडे आलेला पर्यटक फिरण्यासाठी शिरोडा समुद्र किनाऱ्यावर आला होता. तो त्याच्या बरोबर असणाऱ्यांसोबत समुद्राच्या पाण्यात आंघोळीसाठी उतरला. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पोहता पोहता त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडू लागला. किनाऱ्यावर असणाऱ्या नागरिकांना तो बुडत असल्याचे लक्षात येताच नागरीकानी आरडा ओरड केली. त्यावेळी गजानन गावडे, सिद्धेश गावडे यांच्यासह सूरज अमरे, आबा चिपकर, समिर भगत, रोहित म्हाकले यांनी समुद्राकडे धाव घेतली. त्यांच वेळी ग्रामपंचायत सदस्य आजू अमरे यांनी आपल्या कडील लाईफ जॅकेट, रींगरोल घेऊन दाखल झाले. तसेच राज स्पोर्ट चे क्लिफ्टन अल्फांसो यांनी जेस्की द्वारे समुद्रात जाऊन सर्वांच्या सहकार्याने त्या बुडणाऱ्या पर्यटकाला सुखरूप पणे पाण्याबाहेर काढले.त्याच्या नाकातोंडात पाणी गेल्याने तो बेशुद्ध होता. सुरज अमरे यांनी प्रथमोपचार करून त्याला रुग्णवाहिके द्वारे शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उचारांसाठी दाखल केले. त्याची प्रकृती आता सुधारत आहे.दरम्यान शासनाने शिरोडा समुद्रकनारी सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page