You are currently viewing वि. स. खांडेकर विद्या प्रतिष्ठान शिरोडा संस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत ओटवणेकर तर उपाध्यक्षपदी शंकर कांबळी यांची बिनविरोध निवड..

वि. स. खांडेकर विद्या प्रतिष्ठान शिरोडा संस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रकांत ओटवणेकर तर उपाध्यक्षपदी शंकर कांबळी यांची बिनविरोध निवड..

वेंगुर्ला /-


गुरुवर्य वि. स. खांडेकर विद्या प्रतिष्ठान शिरोडा संस्थेच्या कार्यकारिणीची मुदत ३१ मार्च २०२१ रोजी संपली. परंतु कोव्हिड महामारीमुळे निवडणुका लांबल्याने कार्यकारी मंडळाची निवडणूक ऑगस्ट २०२१ ला पार पडली.
या नूतन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत ओटवणेकर तर उपाध्यक्षपदी शंकर कांबळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या नुतन कार्यकारिणीत अध्यक्षपदी चंद्रकांत ओटवणेकर, उपाध्यक्षपदी शंकर कांबळी, खजिनदारपदी प्रमोद कावळे, सचिव पदी उमेश सुकी, सहसचिवपदी मंगेश कांबळी, संचालक म्हणून सुवर्णलता महाले, दिनकर नागवेकर, राजन गावडे, पांडुरंग कौलापुरे, प्रदीप प्रभू, कृष्णा परब, चंद्रशेखर जाधव, सिनेट उपाध्यक्षपदी आमदार दिपक केसरकर, सिनेट सदस्यपदी भाऊ आंदुर्लेकर, रवींद्र धोंड, शिक्षण तज्ञ सिनेट सदस्य व्ही. एन. नाबर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

अभिप्राय द्या..