You are currently viewing निवती-मेढा येथे तुकाराम मेथर यांच्या घरात घरगुतीसिलेंडरचा स्फोट,सुदैवाने मोठा अनर्थ टळला ८ लाखाचे नुकसान.;कोणतीही जीवित हानी नाही..

निवती-मेढा येथे तुकाराम मेथर यांच्या घरात घरगुतीसिलेंडरचा स्फोट,सुदैवाने मोठा अनर्थ टळला ८ लाखाचे नुकसान.;कोणतीही जीवित हानी नाही..

वेंगुर्ले /-

तालुक्यातील निवती-मेढा येथे तुकाराम शामसुंदर मेथर यांच्या घरात आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घरगुती सिलेंडरचा स्फोट झाला. यात स्वयंपाक घराचे व अन्य साहित्य मिळून सुमारे ८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र स्फोट झाल्याचे लक्षात येताच घरातील व्यक्ती वेळीच बाहेर पडल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

निवती मेढा येथील मेथर यांची पत्नी घरात नेहमी प्रमाणे आज सकाळी गॅसवर दूध गरम करत होत्या.यावेळी अचानक गॅसपाइप मधून धूर येऊन सिलिंडरचा स्फोट झाला. दरम्यान प्रसंगावधान राखत घरातील मेथर आपली पत्नी व दोन मुलांसह बाहेर पडले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र स्वयंपाक घराच्या व बाजूच्या दगडी भिंतीना तडे गेले आहेत.

मोठा स्पोटचा आवाज होताच आजूबाजूचे ग्रामस्थ घटनास्थळी धाऊन आले. मात्र तोपर्यंत घरातील वस्तू जळून गेल्या होत्या.याबाबतची माहिती मिळताच कोचरा तलाठी व्ही. आर.ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

स्पोट होऊन लागलेल्या आगीत मेथर यांच्या घरातील फ्रिज, वॉशिंग मशीन, कपाट, भांडी, कपडे तसेच मासेमारी साठी लागणारी एक टन जाळी, 60 किलो रोप, यामा इंजिन यासह अन्य साहित्य जळून खाक झाले तसेच घराच्या भिंती नाही तडे गेले आहेत असे पंचनाम्यात दाखऊन सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तलाठी यांनी नमूद केले आहे. दरम्यान या गॅस सिलेंडर स्पोटा बाबत माहिती मिळताच निवती पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी संकेत पागाडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली.

अभिप्राय द्या..